सहकार्य

संस्थेच्या कार्यात आपण जरूर योगदान देऊ शकता . कृपया संपर्क साधून संस्थेचे कार्यक्रम, आगामी योजना आणि विविध प्रकल्प आणि त्यासम्बंधी विस्तृत माहिती मा. अध्यक्ष किंवा सरकार्यवाह यांचेकडून घ्यावी. *

१) धनराशी किंवा वस्तूच्या स्वरूपात आपण संस्थेला मदत करू शकता.

२)संस्थेच्या कार्यात आपला वैयक्तिक सहभाग आणि सर्व कार्यक्रमात आपली उपस्थिती स्वागतार्ह आहे.

३) स्वेच्छा देणगी कार्यालयाच्या पत्त्यावर रोख किंवा धनादेशाने सुपूर्द करून योग्य ती पावती घ्यावी.

४) संस्थेचे सभासद होऊ इच्छित असाल तर त्यासंबंधीची माहिती कार्यालयात उपलब्ध आहे.

५) या संकेत स्थळावर आपली सभासद म्हणून नोंदणी करा आणि संस्थेशी संपर्क ठेवून व योग्य सूचना करून वेळोवेळी सहकार्य करा, (प्रतिक्रिया दालनास जरूर भेट द्या.)

संपर्क करा.
=======
माननीय अध्यक्ष / सरकार्यवाह ,
अखिल भारतीय कीर्तन संस्था ,
विठ्ठल रखुमाई मंदिर,
द. ल. वैद्य मार्ग,
दादर (प) मुंबई . ४०० ०२८ ,

दूरध्वनी ०२२- २४३२१४७४

विद्युत टपाल ( ईमेल ) abks.dadar@gmail.com

संस्थेचे आधारस्तंभ, हितचिंतक, अथवा सर्वसाधारण सभासद होऊन आपण संस्थेच्या कार्यात सक्रीय मदत करू शकता. अधिक माहितीसाठी संस्था कार्यालयात संपर्क करावा. आतापर्यंत संस्था आपणासारख्या दानशूर मंडळींच्या आधारावरच इतकी वाटचाल करू शकली आहे. यापुढेही आपले सहकार्य सतत मिळत राहील असा विश्वास वाटतो.

( * संस्थेचे अभ्यासक्रम, नित्य कार्यक्रम , अन्य उपक्रम, कीर्तनकार सूची , सभागृहाची उपलब्धता याची संक्षिप्त माहिती आपणास अन्य दालनात मिळू शकेल.)

श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, दादर, मुंबई