सभागृह

सभागृहासंबंधी

दादर सारख्या मुंबईतील मध्यवस्तीत आज संस्था स्वतःच्या भव्य वास्तूत दिमाखात उभी आहे .

संस्थेच्या मालकीच्या वास्तूत तळमजल्यावर श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आणि संस्थेचे कार्यालय आहे.

पहिल्या मजल्यावर कीर्तन पाठशाला आणि ग्रंथालय त्यावर २ मजल्यांवर २ सुसज्ज सभागृहे उपलब्ध आहेत. संस्थेच्या प्रचलित नियमानुसार योग्य ते शुल्क भरून आपण त्याचा उपयोग सुयोग्य रीतीने करू शकता . दादर सारख्या मध्यवर्ती भागात लहान पण सर्व सोयीनी युक्त असे आणि रेल्वे स्थानकापासून चालत फक्त १० मिनिटाच्या अंतरावर असलेल्या या सभागृहाचे आरक्षण आणि योग्य वापर करणे सोयीचे व्हावे यासाठी संस्थेने काही अटी आणि मार्गदर्शक तत्वे स्वीकारली आहेत. त्याची माहिती जरूर करून घ्यावी. विवाह , मुंज, व इतर मंगल कार्ये तसेच सभा, छोटे समारंभ व संमेलनासाठी सभागृह उपलब्ध होईल. सभागृहाचे आरक्षण करताना अटी नियम व इतर सर्व माहिती कार्यालयात उपलब्ध होईल.

आरक्षणासाठी / अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अगर दूरध्वनीवर संपर्क करावा. (दु. क्र. ०२२- २४३२१४७४ )

१)स्व. सौ. कमलाबाई जोशी सभागृह – ( वातानुकूलित ) कमाल १५० ची आसनव्यवस्था , लहान मंच आणि प्रसाधन गृहासह ( दुसरा मजला )

२)छोटे सभागृह – कमाल आसनव्यवस्था – १०० , आणि त्यालगत २ लहान खोल्यांसह, भोजन कक्ष म्हणूनहि वापरण्यास सोयीचे आहे. ( तिसरा मजला )

शुल्क पूर्ण दिवसासाठी.(समय सकाळी ७ ते रात्री ९ )

( वातानुकूलित व्यवस्थेशिवाय आणि १५० आसने , वीज आणि पाणी इ. सोयीसह ) रुपये – ८,०००/-( रुपये आठ हजार मात्र ) आणि अनामत रक्कम रु. ४,०००/- (चार हजार मात्र आहे.)

वातानुकूलन योजनेसह् रु, १३००/- प्रत्येक तासाकरीता अधिक आकारले जातील.

शुल्क पूर्ण दिवसासाठी आणि वरील दोन्ही सभागृहासाठी एकत्रित आकारण्यात येईल.

( उपलब्धतेनुसार सभागृह अन्श-कालासाठी दिले जाईल . कृपया त्याकरिता आगाऊ विचारणा करावी . )

सभागृहाची शाकाहारी भोजन / स्वयंपाकाची व्यवस्था कंत्राट पद्धतीने केलेली नाही.आपण आपला भोजन कंत्राटदार आणू शकता.३०० माणसाना पुरेल इतक्या स्वयंपाकासाठी भांडी आणि आतील सजावट मात्र संस्थेने केलेली आहे. त्याचे अतिरिक्त भाडे द्यावे लागेल.

( सूचना- कोणतेही कारण व पूर्वसूचना न देता, सभागृह देणे किंवा न देणे , शुल्कात बदल करणे, सोयी-सुविधांची फेररचना, याचे सर्वाधिकार कार्यकारी मंडळ राखून ठेवीत आहे, याची कृपया नोंद घ्यावी.)

श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, दादर, मुंबई