अभ्यासक्रम

कीर्तनालंकार पदविका अभ्यासक्रम

दादर येथील कीर्तनवर्ग

१) ३ वर्षे मुदतीचा अंश-कालीन पदविका अभ्यासक्रम. प्रवेश प्रक्रिया मे महिन्यात सुरु. वर्ग जून पहिल्या सप्ताहात सुरु होतो
२) प्रवेश सर्वांसाठी मुक्त, शिक्षण, वय, जात, अशा अटी नाहीत.
३) वर्ग दादर येथे सायं. ६ ते ८.३० या वेळात आठवड्यातून २ वेळा.
४) मराठी माध्यमातून नारदीय कीर्तनाच्या सर्व अंगांचे शास्त्र शुद्ध शिक्षण दिले जाते.
५) ३ वर्षांचे वार्षिक शुल्क अनु, प्रथम वर्ष . रु. १०००/– द्वितीय वर्ष . रु. १२००/– आणि तृतीय वर्ष रु. १४००/- आहे.
६) नियमित चाचणी परीक्षा, नामवंत कीर्तंनकारांची प्रात्यक्षिके,
७) सुसज्ज ग्रंथालय (सशुल्क) आणि कीर्तन सरावाच्या अनेक संधी उपलबद्ध .
८) शैक्षणिक शिबिरे, स्पर्धा, सराव कीर्तने आणि चक्री कीर्तनाचे आयोजन.
९) लेखी आणि प्रात्यक्षिक वार्षिक परीक्षा वर्षाअखेरीस एप्रिल मध्ये.
१०) तिसऱ्या वर्षाला प्रत्येकास स्वतंत्र कीर्तन लेखन व सादरीकरण करण्यासाठी प्रकल्प आणि त्यासाठी मार्गदर्शन.

कीर्तन विशारद, दूरस्थ अभ्यासक्रम

घर बसल्या कीर्तनकार व्हा !

१) प्रवेशासाठी कोणत्याही अटी नाहीत.बाहेरगावी राहणाऱ्यांना अग्रक्रम.
२) शुल्क रू, १५००/- प्रत्येक दीड वर्षाच्या सत्रासाठी.
३) प्रत्येकी दीड वर्षाची ३ सत्रे . (साडेचार वर्षाचा परिपूर्ण ” कीर्तन विशारद पदविका ” अभ्यासक्रम)
४) अभ्यासक्रमानुसार प्रत्येक सत्रासाठी वाचनाचे साहित्य आणि ध्वनी तबकडी दिल्या जातात.
५) दर महिन्यात एका रविवारी दादर येथे सराव शिबिरे व शंका समाधान केले जाते.
६) घरच्या घरी अभ्यासक्रम पूर्ण करून दादर येथे प्रत्येक सत्रानंतर लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा.
७) आपल्या नजीक राहणाऱ्या अनुभवी कीर्तनकरांचा परिचय आणि मार्गदर्शन उपलब्ध
८) संस्थेच्या प्रगत अभ्यासक्रमासाठी अग्रक्रमाने प्रवेश दिला जातो.
मुम्बई येथे मुख्य केन्द्र असून या अभ्यासक्रमाची ३ उपकेन्द्रे चिपळूण, गोवा आणि बीड येथे आहेत .


प्रगत कीर्तन प्रशिक्षण वर्ग

एक प्रगत अभ्यासक्रम. ( फक्त कीर्तनकारांसाठी.)

१) ” कीर्तन करतो तो कीर्तनकार.” या एकाच निकषावर मराठी लिहू-वाचू आणि बोलू शकणाऱ्या कुणालाही प्रवेश.
२) २ वर्षांचा प्रगत अभ्यासक्रम, संस्थेच्या ” कीर्तनालंकार / कीरतन विशारद ” पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना अग्रक्रम.
३) दादर किंवा मध्य रेल्वेवर कर्जत, जिल्हा रायगड येथे शनिवार / रविवार अशी २ दिवसाची ४ निवासी शिबिरे.
४) विविध नामवंत कीर्तनकारांचे मार्गदर्शन. सुयोग्य शांत व निसर्ग रम्य वातावरण.
५) धर्म, संस्कृती, आणि नारदीय कीर्तन विषयक ग्रंथांचा अधिक परिचय व अभ्यास.
६) प्रात्यक्षिके, सराव, चर्चासत्रे, व्याख्याने यांचे आयोजन. आणि प्रतिवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा.
७) आजी – माजी विद्यार्थी आणि नामवंत कीर्तनकारांशी परिचय .
८) यशस्वी कीर्तनकारांना ” कीर्तन मधुकर ” सन्मान प्राप्त होतो .
९) शुल्क प्रत्येक शिबिरासाठी निवास आणि भोजनासह रु. ५००/-

संगीत वर्ग

संवादिनी आणि तबला वादनाचे वर्ग

१) निष्णात वादकाकडून मार्गदर्शन.
२) प्रवेशासाठी सर्वाना समान संधी उपलब्ध.
३) संस्थेची स्वतःची वाद्ये उपलब्ध आहेत.
४) वर्ग दादर येथे सोयीच्या वेळात.
५) प्रगतीनुसार कीर्तनासाठी साथ करणे शक्य.
६) सर्वाना परवडेल असे माफक शुल्क.

भजन आणि सुगम संगीत गायन वर्ग

भजन आणि सुगम संगीत गायन वर्ग फक्त महिलांसाठी प्रवेश.

१) तज्ञ आणि कुशल व्यक्तीकडून मार्गदर्शन.
२) आठवड्यातून एक दिवस, दुपारचे वर्ग. मंगळवारी भजन वर्ग आणि बुधवारी सुगम संगीत गायन वर्ग.
३) संगीत साथीसह नियमित सराव आणि मार्गदर्शन.
४) बाहेरील कार्यक्रमात सादरीकरण व सहभाग शक्य.
५) सर्वाना परवडेल असे माफक वार्षिक शुल्क. भजन वर्ग रु. १०००/- आणि सुगम गायन वर्ग रु. १६००/-

पौरोहित्य वर्ग

१) सुमारे १ वर्षाचा परिपूर्ण अभ्यासक्रम.
२) श्री सत्यनारायण पूजा, श्री गणेश पूजा तसेच अन्य महत्वाच्या पूजा विधीचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन.
३) निवडक स्तोत्रे व पूजा मंत्रांचे पाठांतर.
४) संस्कृत भाषेचा उच्च्चारासाहित भरपूर सराव.
५) प्रवेशासाठी जाती , धर्माची , शिक्षणाची बंधने नाहीत .
६) माफक शुल्क. वर्ग दुपारी सोयीच्या वेळेत .

संस्थेतील अन्य कार्यक्रम

शैक्षणिक वर्गाखेरीज संस्थेत वर्षभर अनेक कार्यक्रम आणि उपक्रम सुरु असतात. ” कार्यक्रम ” या दालनात ते आपण पहालच .

( विशेष सूचना – वरील सर्व वर्गांचे अभ्यासक्रम, शुल्क आणि वर्गाच्या वेळेत कालमानाने बदल होउ शकतो. कृपया कार्यालयाशी संपर्क करून माहिती घ्यावी. )

श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, दादर, मुंबई