कीर्तन मधुकरचे नवे सत्र

कीर्तन मधुकर अभ्यास क्रमाला प्रारंभ

दादर ः १६/०९/२०१७

दादर येथील नामांकीत अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या २ वर्षीय ” कीर्तन मधुकर ” या प्रगत पदवी अभ्यासक्रमाची सुरूवात आज दादर येथील अ.भा .की. संस्थेच्या जोशी सभागृहात झाली. कीर्तन विशारद व कीर्तन अलंकार पदवी प्राप्त झालेल्या ३० कीर्तनकारांनी आज पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन आपली उपस्थिती नोंदवली.

माननीय. ह.भ.प. श्री.विठ्ठल परब गुरूजी यांनी प्रास्ताविक करून माननीय.ह.भ.प.श्री.श्रीराम चितळे यांना पुढील सूत्रे दिली. ह.भ.प.श्री. श्रीराम बुवा चितळे हे नामांकीत राष्ट्रीय कीर्तनकार आहेत. ४४ वर्षे प्रदीर्घ ७००० पेक्षा जास्त असा कीर्तन सेवेचा त्यांना अनुभव असून आजपर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. काही वर्षापूर्वी त्यांची ७१५७ वी कीर्तनसेवा व आणखी काही कीर्तनसेवा पनवेल येथे ऐकण्याचा मला योग आला होता.

मा.चितळे गुरूजींनी सूत्रे हातात घेताच मोकळ्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात अभ्यासक्रमाला सुरूवात केली. कीर्तनाला धुमधडाक्यात सुरूवात करायची हा पहिला अत्यंत मोलाचा धडा वजा सल्ला कीर्तनकारांना दिला. त्याच बरोबर एक पूर्वरंग निरूपण , गायन , अभिनय , वक्तृत्व इत्यादी विषयांचं मार्गदर्शन आपल्या प्रदीर्घ अनुभवाने दिलं. दि.१६ व १७ रोजी पूर्ण दिवस मा.चितळे गुरूजी यांचं मार्गदर्शन कीर्तनकारांना मिळणार आहे.

संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.उपाध्ये गुरूजी यांनी सुद्धा मधल्या वेळेत उपस्थित कीर्तनकारांशी संवाद साधून महत्त्वाच्या टीप्स दिल्या .

संस्थेचे मा. पदाधिकारी , मा. चितळे बुवा व अखिल
भारतीय कीर्तन संस्थेचे आम्ही आभारी आहोत.

यानंतरचे शिबीर डीसेम्बर मध्ये होणार आहे असे समजते.

शब्दांकन. ह.भ.प. श्री.हर्षद माजरेकर पनवेल

Leave a Reply