वर्धापनदिन २०१७

श्रावण वद्य पंचमी हा संस्थेचा वर्धापन दिन. या वर्षीही मोठ्या उत्साहात आणि आनंददायक वातावरणात संपन्न झाला.
शुक्रवार दिनांक ११-८-२०१७ रोजी कार्यक्रमाची सुरुवात ४ ते ५.३० ह.भ.प. श्री. लडीबुवा यांच्या सुश्राव्य कीर्तनाने झाली. त्यानंतर संस्थेच्या सुगम संगीत वर्गाच्या विद्यार्थ्यांनी ५.३०.ते ८.००.संगीताचा बहारदार कार्यक्रम सदर करून श्रोत्यांची मने जिंकली.ह.भ.प.सौ सुरेखा जोशी यांनी या सादरीकरणासाठी मार्गदर्शन केले होते.

शनिवारी सकाळी श्रीविष्णुयागाचे आयोजन करण्यात आले होते.त्यालाही भाविकांची उपस्थिती उत्तम होती. सायंकाळच्या समारोहात ३.००-४.०० विठाई पुण्याई भजन मंडळाचे भजन झाले. संचालन श्रीमती उषा जोशी यांनी केले होते.
४.00-५.०० एक खास कीर्तन हे या वर्षीचे खास वैशिष्ठ्य होते. पुण्याचे जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. श्री. रामचंद्रबुवा गोऱ्हे यांनी आपल्या भावपूर्ण कीर्तनाने वर्धापन दिनाची शोभा वृद्धिंगत केली.

श्री. गोर्हेबुवांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना “कीर्तन अलंकार ‘ पदविका प्रमाणपत्रे देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी आणि भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.

पदविका प्रदान कार्यक्रमानंतर ह.भ.प. श्री. रामचंद्रबुवा गोऱ्हे यांना संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले. प्रतिवर्षी संस्था एका जेष्ठ कीर्तनकाराला “कीर्तन क्षेत्रात केलेल्या सेवेबद्दल सन्मानित करीत असते. या वर्षी श्री गोऱ्हे बुवा यांचा शाल,श्रीफळ,आणि मानधन आणि सन्मानपत्र देवून उचित गौरव करण्यात आला.
त्यानंतर संस्थेच्याच विद्यार्थ्यांनी “गीत गोविंद ” हे नृत्य नाट्य आणि गीत गायन सदर केले. त्याचे सूत्रधार श्री संजय पंडित, विलेपार्ले यांनी केले होते. याही कार्यक्रमास श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

या सर्व समारंभास संस्थेच्या अध्यक्ष,सचिव आणि कार्यकारी मंडळाचे सुयोग्य मार्गदर्शन आणि असंख्य विद्यार्थी,भाविक आणि संस्थेच्या कर्मचारी वर्गाचे पूर्ण सहकार्य आणि परिश्रम लाभले होते.

Leave a Reply