आगामी उपक्रम अणि योजना

संस्थेचे मुख्य उद्दिष्ट नारदीय कीर्तनाचा प्रचार, प्रसार आणि प्रशिक्षण हे असून ते पूर्ण करण्यासाठी संस्थेपुढे अनेक योजना कार्यान्वित करण्याचे स्वप्न आहे. कीर्तनाच्या माध्यमातून आजच्या माहिती महाजालाच्या वेगवान युगातही सामाजिक जागृतीसाठी प्रयत्न होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी संस्था सतत सर्वतोपरीने कार्य करीतच आहे. शिवाय संस्थेची काही दूरगामी ध्येये आहेत.आपणासारखे दानशूर आणि कीर्तन-प्रेमी भाविक आणि हितचिंतक संस्थेला या ध्येयासाठी सतत प्रेरणा देत राहतील असा विश्वास वाटतो.

आगामी योजना आणि कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही हे करू इच्छितो.

१) लहान खेड्यात कीर्तनकार पाठवून या माध्यमातून लोकशिक्षण आणि जनजागृती करणे.
२) गरजू लोकांसाठी आणि वन्य बांधवांसाठी धान्य कपडे आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे .
३) दुर्बल आणि गरजू कीर्तनकार आणि साथीदार मंडळीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करणे.
४) शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी कीर्तनाच्या माध्यमातून संस्कार आणि मार्गदर्शन.
५) समाजातील अप-प्रवृत्तीच्या निवारणासाठी नव्या कीर्तनाचे लेखन, प्रकाशन आणि सादरीकरण.
६)केंद्रीय आणि महाराष्ट्र राज्य सरकारी उपक्रम आणि समाज कल्याण योजनांना कीर्तन माध्यमातून सक्रीय मदत आणि सहकार्य करणे.
७)२०१४ मध्ये संस्थेने आपला ७५ वा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला.या निमित्ताने संस्थेने अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यापुढेही अनेक नवे उपक्रम आणि नवीन योजना सुरु करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
८) सध्या विजेचे दर सतत वाढत असल्याने त्या खर्चाला आवर घालण्यासाठी दादर येथील संस्थेच्या इमारतीत सौर उर्जेचे संयंत्र बसविणे.
९)नारदीय कीर्तन-प्रवचन या विषयावर संशोधन आणि सखोल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि संस्था यांना सर्व प्रकारे मदत आणि मार्गदर्शन करणे.

( संस्थेवरील भक्त मंडळींच्या अतूट विश्वासामुळे आणि झपाटून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावरच संस्था आज अनेक वर्षे नव-नवीन उपक्रम हाती घेत आहे. आम्हाला नित्य प्रेरणा देणाऱ्या या संस्थेच्या इतिहासाची आणि कर्तबगार कार्यकर्त्यांची ओळख आपणास ” इतिहास ” आणि ” व्यवस्थापन ” या दालनात अवश्य होईल.)

Leave a Reply